Tuesday, May 26, 2020

भारतीय प्रबोधन

एकोणिसाव्या शतकात भारतामध्ये प्रबोधनयुगास सुरुवात झाली . भारताला मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधन ही एक व्यापक चळवळ होती . सामाजिक , राजकीय , धार्मिक , आर्थिक , सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाचा आविष्कार झाला . त्याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत .

भारतीय प्रबोधन :

भारतीय समाजातील कर्मकांडाचे स्तोम , अंधश्रद्धा , रूढिप्रियता , जातिभेद , उच्चनीचता , चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे समाजाची प्रगती कुंठित झाली आहे , याची जाणीव सुशिक्षित भारतीयांना होऊ लागली . समाज मागासलेला असल्यामुळे देशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले , हे त्यांच्या लक्षात आले . देशाची उन्नती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार ते करू लागले . समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा मार्ग ते शोधू लागले . भारत आधुनिक कसा होईल यासंबंधी विचार मांडले जाऊ लागले . तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ' भारतीय प्रबोधन ' असे म्हणतात . असे वैचारिक परिवर्तन पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गात प्रथम सुरू झाले . पाश्चात्त्य ज्ञानातून मिळणारे नवे विचार , नवी मूल्ये या वर्गाने आत्मसात केली .

स्त्रीविषयक सुधारणा :

राजा राममोहन रॉय
राजा राममोहन रॉय  
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थती दयनीय होती . त्यांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती . त्यांना शिक्षण नाकारण्यात आलेले होते . स्त्रियांना आर्थिक व सामाजिक अधिकार नव्हते . बालिकाहत्या , बालविवाह , जरठ - कुमारी विवाह , हुंडापद्धती , सती , केशवपन , विधवाविवाहबंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या . स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला . सतीच्या निघृण चालीविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतीबंदीचा कायदा झाला. 
गोपाळ हरि देशमुख ( लोकहितवादी ) यांनी हिंदू समाजव्यवस्थेतील स्त्रीविषयक अनिष्ट रूढींवर कडाडून टीका केली . ' ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत , म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत , ' अशा शब्दांत त्यांनी स्त्री - पुरुष समानतेचा पुरस्कार केला .

महात्मा फुले
महात्मा फुले  
महात्मा जोतीराव फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली . समाजाचा रोष पत्करूनसुद्धा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या शाळेत शिकवत असत . जगन्नाथ शंकरशेट ,
ईश्वरचंद्र विद्यासागर , पंडिता रमाबाई इत्यादी समाजसुधारकांनी स्त्रीशिक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले . महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले . केशवपनाची चाल बंद व्हावी , म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा एक संप घडवून आणला . स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते . स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता . त्यांच्या प्रयत्नांचेच एक फळ म्हणजे ताराबाई शिंदे यांचा ' स्त्री पुरुषतुलना '
( १८८२ ) हा ग्रंथ होय . बुलढाणा परिसरातील एका मराठमोळ्या कुटुंबातील या स्त्रीने अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला .
विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर , विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलु यांनी विशेष प्रयत्न केले . चूल आणि मूल या क्षेत्रापुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तीस गोपाळ गणेश आगरकर यांनी कडाडून विरोध केला . मुलामुलींना एकसारखेच शिक्षण दिले पाहिजे , असे त्यांचे मत होते . सार्वजनिक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे , हा विचार त्यांनी ठासून सांगितला .

 महर्षि धोंडे केशव कर्वे
महर्षि धोंडे केशव कर्वे 
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला . त्यांच्या प्रयत्नांतूनच विसाव्या शतकात पहिले महिला विदयापीठ उभे राहिले . महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाजातील
स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली . त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली . पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला , तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चीक विवाहपद्धतीचा त्यांनी धिक्कार केला .
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली . त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया सहभागी होऊ लागल्या , या चळवळीमुळे स्त्रीसुधारणा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू लागली .
स्त्रीसुधारणा चळवळीमुळे अनेक अन्यायकारक प्रथा बंद झाल्या , स्त्रियांना समानतेने वागवले पाहिजे , ही दृष्टी वाढू लागली . जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले .

जातिभेद निर्मूलनाची चळवळ :

गोपाल गणेश आगरकर
गोपाल गणेश आगरकर 
भारतीय समाजात जातिव्यवस्था प्रचलित होती . विषमता , शोषण , अन्याय यांवर जातिव्यवस्था आधारलेली होती . भारताची प्रगती साधायची असेल , तर जातिभेदाचा अडसर दूर व्हायला हवा हे समाजसुधारकांनी ओळखले . लोकहितवादी , महात्मा फुले , गोपाळ गणेश आगरकर , स्वामी दयानंद सरस्वती , नारायण गुरू , वीरेशलिंगम पंतलु यांसारख्या सुधारकांनी जातिव्यवस्थेतील दोषांवर कडाडून हल्ला केला . महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा काढल्या . आपल्या लेखनाद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला . शिक्षणाच्या संधी फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरत्या मर्यादित न ठेवता , दलित वर्ग व स्त्रिया यांना शिक्षणाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत , अशी त्यांची भूमिका होती . त्यांनी ' सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली . आपल्या चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक समता व न्याय ही मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला .
नारायण गुरू यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये सुधारणा चळवळ उभारली . त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातिभेद नष्ट करण्याला महत्त्व दिले .

धर्मसुधारणा चळवळ :

भारतात काही सुधारणावादी संस्था स्थापन झाल्या . त्यांनी समाजसुधारणा व धर्मसुधारणा यांना चालना दिली .
राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये ' ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली . ब्राम्हो समाजाचे अनुयायी ' ईश्वर एकच आहे ' , असे मानत असत . दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी ' परमहंस सभा ' स्थापन केली . जातिसंस्थेला विरोध हे या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते . आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबईत ' प्रार्थना समाजा'ची स्थापना केली . न्यायमूर्ती .  म. गो . रानडे , डॉ . रा . गो . भांडारकर आणि न्यायमूर्ती कृ . त्र्यं . तेलंग हे प्रार्थना समाजाचे नेते होते . प्रार्थना समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली . कर्मकांडांऐवजी भजन व प्रार्थना हा ईश्वरपूजेचा मार्ग सांगितला .
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद 
स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत ' आर्य समाज ' स्थापन केला . स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली . त्यांनी मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे , ही शिकवण दिली . या संस्थांनी समाजातील अंधश्रद्धा , जातिव्यवस्था इत्यादी दोषांवर टीका केली . धर्मग्रंथांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सदसद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवण्याची शिकवण या संस्थांनी दिली . ' रामकृष्ण मिशन ' , ' आर्य समाज ' आणि ' थिऑसॉफिकल सोसायटी ' या संस्थांनी जगाला भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली .
शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे ' सिंगसभा ' स्थापन झाली . शीख समाजात या संस्थेने शिक्षणप्रसार व आधुनिकीकरण घडवून आणण्याचे काम केले . पुढे ' अकाली चळवळी'ने शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा चालू ठेवली .
अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील समाजसुधारणेला प्रारंभ केला . त्यांनी बंगालमध्ये ' द मोहमेडन लिटररी सोसायटी ' या संस्थेची स्थापना केली . सर सय्यद अहमद खान यांनी ' मोहमेडन अँग्लो - ओरिएंटल कॉलेज ' स्थापन केले . पुढे याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले . मुस्लिम समाजातील अज्ञान , अंधश्रद्धा , अनिष्ट रूढी यांना त्यांनी वीरोध केला . पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही , असे त्यांचे ठाम मत होते .

प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार :

सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधनकाळात साहित्य , कला , विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती . साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना , तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी . व्ही . रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले . त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते . अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली .
या काळात साहित्य व कलेच्या क्षेत्रात खूप बदल घडून आले . कादंबरीसारखा नवा साहित्यप्रकार उदयास आला . सामान्य स्त्री - पुरुषांच्या जीवनाचे चित्रण साहित्यातून घडू लागले . विचारांना चालना देणारे निबंध लिहिले जाऊ लागले . निसर्गसौंदर्य , राष्ट्रप्रेम , मानवी भावना यांचा आविष्कार प्रादेशिक भाषांमधून होऊ लागला . कथा - कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली . समाजसुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला .
या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या . या लेखनातून स्त्री - मन प्रभावीपणे व्यक्त होऊ लागले . नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाजसुधारणा राजकीय जागृतीची वाहक ठरली .
साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली . संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले . राष्ट्रीय चळवळीतसुद्धा संगीतकलेचा वापर केला गेला . मराठीत संगीत नाटके सादर केली जाऊ लागली .
भारतीय शैली आणि पाश्चात्त्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली , अजिंठा शैली , मुघल व पहाडी लघुचित्रशैली यांचे या काळात पुनरुज्जीवन झाले . स्थापत्यावर पाश्चात्त्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला .
विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले . प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे भारताच्या प्रगतीसाठी असणारे महत्त्व लोकांना उमगू लागले .
आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कारही महत्त्वाचा आहे . स्वातंत्र्य , समता , राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली .

Monday, May 25, 2020

स्वराज्यस्थापना

     शके १५५१ , फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच १ ९ फेब्रुवारी , १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीमहाराजांचा जन्म झाला . शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते . मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली . या मोहिमेत विजापूरच्या आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले . शहाजीराजांनी त्यांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला ; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही . इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली .
निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले . शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नदयांमधील पुणे , सुपे , इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने त्यांच्याकडेच ठेवला . आदिलशाहाकडून शहाजीराजांना कर्नाटकात बंगळूर व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला .
शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीचा कारभार शिवाजीराजे व वीरमाता जिजाबाई यांच्याकडे सोपवला . त्यांच्यासोबत दादाजी कोंडदेव हा एकनिष्ठ व अनुभवी अधिकारी दिला . दादाजीने जहागिरीमध्ये शांतता व सुव्यवस्था निर्माण केली .

सहकारी : 

शिवाजीमहाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली . मावळचा प्रदेश डोंगराळ , दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम .
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजीमहाराज
मावळच्या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत मोठ्या कौशल्याने केला . त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली . या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले . येसाजी कंक , बाजी पासलकर , बापूजी मुद्गल , नन्हेकर देशपांडे बंधू , कावजी कोंढाळकर , जिवा महाला , तानाजी मालुसरे , कान्होजी जेधे , बाजीप्रभू देशपांडे , दादाजी नरसप्रभू देशपांडे यांसारखे अनेक सवंगडी , सहकारी मिळाले . या सहकाऱ्यांच्या बळावर शिवाजीमहाराजांनी स्वराज्याचे कार्य हाती घेतले .

राजमुद्रा :

स्वराज्यस्थापनेमागील शिवाजीमहाराजांचे ध्येय त्यांच्या तत्कालीन राजमुद्रेवरून स्पष्ट होते . त्यांच्या या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत .

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा
शिवाजी महाराजांची राजमुद्रा
शिवाजीमहाराजांनी या राजमुद्रेतून ' शहाजीचा पुत्र शिवाजी याचे प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारे लोकांच्या कल्याणासाठी आहे , ' अशी लोकांना ग्वाही दिलेली आहे .

स्वराज्यस्थापनेच्या हालचाली :

शिवाजीमहाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अमलात नव्हते , तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते . त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते . किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे . ज्याचे किल्ले त्याचे  राज्य अशीपरिस्थिती असे . यामुळे किल्ले  ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते . आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात
घेण्याचे महाराजांनी ठरवले . त्यांनी मुरुंबदेव , तोरणा , कोंढाणा , पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली . मुरुंबदेव किल्ल्याची डागडुजी करून त्याचे नाव ' राजगड ' ठेवले . सुरुवातीच्या काळात राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती .
आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे , मुधोळचे घोरपडे व वाडीचे सावंत इत्यादी सरदार होते . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता . या व अशांसारख्या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्यस्थापनेसाठी आवश्यक होते .

जावळीचा ताबा :

सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता . स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला , तेव्हा इ.स. १६५६ मध्ये शिवाजीमहाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला . तेथे आपले ठाणे वसवले . नंतर रायगडही जिंकून घेतला . जावळीवरील विजयाने महाराजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या . त्यांनी किनारपट्टीवरील कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली . त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी , पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी आला . सत्तांशी संघर्ष करायचा असेल , तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे महाराजांच्या लक्षात आले . त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले . जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला .  जावळीची प्रचंड संपत्ती शिवाजीमहाराजांच्या हाती पडली . अशा रीतीने जावळीच्या विजयाने त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले .

अफजलखानाचे पारिपत्य :

शिवाजीमहाराजांनी आपल्या व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली होती . जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता . कोकण किनारपट्टीवर स्वराज्यस्थापनेच्या कार्यास गती आली होती . या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते . या वेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीण पाहत होती . शिवाजीमहाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी तिने आदिलशाहीतील अफजलखान या बलाढ्य व अनुभवी सरदारास पाठवले .
अफजलखान विजापूरहून तुळजापूर , पंढरपूर व रहिमतपूर या मार्गे वाईस आला . वाटेत त्याने लोकांना व मंदिरांना उपद्रव दिला . अफजलखानास वाई प्रांताची चांगली माहिती होती . वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांची १० नोव्हेंबर १६५ ९ रोजी भेट झाली . या भेटीत अफजलखानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे त्यांनी अफजलखानास ठार मारले . आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले .
अफजलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली . ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली , त्यांना बक्षिसे दिली . अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी शिवाजीमहाराजांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना चांगली वागणूक दिली .

सिद्दी जौहरची स्वारी :

शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजलखानाचे पारिपत्य केले होते . त्यानंतर त्यांनी आदिलशाहीतील पन्हाळा , वसंतगड व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले . खेळणा किल्ल्यास महाराजांनी ' विशाळगड ' असे नाव दिले .
शिवाजीमहाराजांनी आदिलशाहीसमोर मोठे आव्हान निर्माण केले , तेव्हा आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले . आदिलशाहाने सिद्दीला ' सलाबतखान ' असा किताब दिला . सिद्दी जौहरच्या मदतीस रस्तुम - इ - जमान , बाजी घोरपडे व फाजलखान हेही होते . या परिस्थितीत शिवाजीमहाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला . सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा चालू होता . वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते . नेतोजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला ; परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने ते शक्य झाले नाही . सिद्दी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती . तेव्हा महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली . त्यामुळे पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली .
या  परिस्थितीचा फायदा शिवाजीमहाराजांनी घेतला . ते पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले . ही बातमी सिद्दीस समजली . सिद्दीच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला . महाराजांनी सिद्दीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ झ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे याच्याकडे सोपवली . बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत सिद्दीच्या सैन्यास अडवले . त्याने पराक्रमाची शर्थ केली . या संघर्षात बाजीप्रभूला वीरमरण आले . बाजीप्रभूच्या सैन्याने सिद्दीच्या सैन्यास थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले . विशाळगडाकडे जाताना महाराजांनी आदिलशाही सरदार पालवनचे दळवी व शृंगारपूरचे सुर्वे यांचाही विरोध मोडून काढला . महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले .
शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते , तेव्हा मुघल सरदार शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती . आदिलशाहीशी संघर्ष चालू होता . मुघलांचे सैन्यही स्वराज्यावर चालून आले होते . अशा परिस्थितीत दोन शत्रूबरोबर एकाच वेळी लढणे , ही गोष्ट बरोबर होणार नाही , हे महाराजांनी लक्षात घेतले . विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला . या तहानुसार पन्हाळा किल्ला आदिलशाहाला परत केला .

Sunday, May 24, 2020

मुघल सत्तेची स्थापना व विस्तार

इ.स. १५२६ मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली . तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली . मुघल सत्तेची स्थापना आणि तिचा  विस्तार यासंबंधीची माहिती आपण मिळवणार आहोत . 

बाबर :

बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय . तो मध्य आशियातील फरघाना राज्याचा राजा होता . मध्य आशियातील सत्तास्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लाभले नाही . त्याने अफगाणिस्तानातील काबूल , गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला . अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली . भारतातील संपत्तीसंबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते , म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली . 
बाबर
बाबर 
दिल्लीमध्ये इब्राहीम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता . सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशात दौलतखान लोदी हा प्रमुख अधिकारी होता . इब्राहीम लोदी आणि दौलतखान लोदी याच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला . दौलतखानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले . ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले . बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरिता इब्राहीम लोदी सैन्य घेऊन निघाला . इब्राहीम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये २१ एप्रिल १५२६ या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली . या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी बाबर उपयोग केला . इब्राहीम लोदीच्या सैन्याचा पराभव केला . या लढाईनंतर  पुढे दिल्लीकडे गेला . भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते .
पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपुतांच्या विरोधास तोंड दयावे लागले . मेवाडच्या राणासंगाने राजपूत राजांना एकत्र आणले . बाबर आणि राणासंग यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली . या लढाईत राणासंग आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली , तथापि याही लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली . राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला . अशा रीतीने राजपुतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यात बाबर यशस्वी झाला . इ.स. १५३० मध्ये बाबराचा मृत्यू झाला .

हुमायून :

बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला , बाबराने अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती . अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते . बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेरखान आणि हुमायून यांच्यामध्ये चौसा या ठिकाणी लढाई झाली . शेरखानाने या लढाईत हुमायूनचा पराभव केला . चौसाच्या लढाईनंतर शेरखानाने ' शेरशाह ' हे नवीन नाव धारण केले . हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनोज येथे इ.स. १५४० मध्ये पुन्हा लढाई झाली . याही लढाईत शेरशाहाने हुमायूनचा पराभव केला . शेरशाहाने आग्रा , दिल्ली जिंकून घेतले . बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला . शेरशाहाने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली . हुमायूनला पुढे पंधरा वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली .

शेरशाह सूर :

दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशाहाने आपल्या राज्याचा विस्तार केला . त्याच्या साम्राज्यामध्ये पंजाब , मुलतान , सिंध , राजस्थानचा बराचसा भाग , माळवा , बुंदेलखंड या प्रदेशांचा समावेश होता .
शेरशाहाने प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणली . जमीन महसूल पद्धतीमध्ये सुधारणा केली . एकूण पीक उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा हिस्सा निश्चित केला . त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली . लोककल्याणाकडे विशेष लक्ष पुरवले . राजधानीला जोडणाऱ्या महामार्गावर सरायांचे जाळे निर्माण केले . सैन्याच्या हालचालींसाठी व टपालाची ने - आण करणाऱ्या सेवकांसाठी सरायांचा उपयोग होत होता . शेरशाहाने चलनव्यवस्थेत सुधारणा केली . रुपया हे नाणे त्यानेच सुरू केले . त्याने व्यापार आणि व्यवसायास चालना दिली . साम्राज्याच्या बाहेरून साम्राज्यात वस्तू आणताना त्यावरील अनावश्यक कर त्याने रद्द केले .
शेरशाहाचे नाणे रुपया
शेरशाहाचे नाणे - रुपया 
शेरशाह हा न्यायी होता . सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा , असा त्याचा कटाक्ष होता . गरिबांसाठी त्याने मोफत अन्नछत्रालये सुरू केली . अनाथ मुले , विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे . अशा रीतीने कार्यक्षम प्रशासनाबरोबरच जनहित साधण्याचा त्याने प्रयत्न केला . इ.स. १५४५ मध्ये शेरशाहाचा मृत्यू झाला .

अकबर :

सम्राट अकबर , samrat akabar
सम्राट अकबर 
हुमायूनने अफगाणांकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली . त्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला .त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला . अकबराचा अफगाणांबरोबर संघर्ष  अटळ होता . सूर घराण्यातील सुलतान मुहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू याच्या बरोबर १५५६ मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झाली . अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला . मुघलांनी निर्णायक विजय मिळवला . सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली . ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते .
अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता . त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला . युद्धकैदयांना गुलाम केले जाण्याची प्रथा बंद केली . यात्रा कर , जिझिया कर यांसारखे कर रद्द केले . सती , बालहत्या यांसारख्या प्रथांवर बंदी घातली . विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली .
अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते . सर्व धर्मांतील चांगली तत्त्वे एकत्र करून अकबराने ' दीन - इ - इलाही ' ही नवी व्यवस्था निर्माण केली . मानवतावाद , एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्त्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती . हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता . अकबराने दीन - इ - इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही .
अकबर हा विदयाप्रेमी आणि कलाप्रेमी होता . अकबराच्या दरात अनेक विद्वान व्यक्ती , तसेच गुणी कलाकार होते . अबूल विद्वान पंडित व इतिहासकार होता . फैजी हा कवी व तत्त्वज्ञ होता .  मुत्सद्देगिरी व चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता . तानसेन हा संगीत सम्राट होता . बदायुनी हा प्रसिद्ध इतिहासकार होता . गुणग्राहकता , दृष्टी , मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे . इ.स .१६०५ मध्ये सम्राट अकबराचा मृत्यू झाला .
अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत , तर पश्चिमेला काबूल , कंदाहारपासून पूर्वेला बिहार , बंगालपर्यंत पसरले होते . अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले . या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राणा प्रताप आणि अहमदनगरची चांदबिबी यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे .

राणा प्रताप :
महाराणा प्रताप
महाराणा प्रताप 

अकबराला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता . अकबराच्या या साम्राज्यवादी धोरणास मेवाडचा राणा उदयसिंह याने विरोध दर्शवला . मेवाडची राजधानी चितोडला अकबराने वेढा दिला व चितोडचा किल्ला जिंकून घेतला . उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आला . त्याने मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालू ठेवला . कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही त्यास तोंड द्यायचे , असा निर्धार त्याने केला . अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकून घेता आला नाही . अशा रीतीने राणा प्रतापने अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला .

चांदबिबी :

इ.स. १५९५ मध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला . मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला . अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार स्त्री चांदबिबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला . या वेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली . या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले . पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला . मात्र संपूर्ण निजामशाहीचे राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही .

Saturday, May 23, 2020

१८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला . हा लढा काही अचानक उद्भवला नाही . त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते . मात्र १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन त्याला ' स्वातंत्र्यसमर ' हे नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दिले . सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' या पुस्तका अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली .

 १८५७ पूर्वीचे लढे :

भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली , तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले . त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढे दिले . शेतकरी , कारागीर , आदिवासी , फकीर , सैनिक अशा विविध गटांनी हे लढे दिले .
कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले . त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला . सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले . असेच लढे गुजरात , राजस्थान , महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले .
भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले . जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या त्यांच्या हक्कांवर ब्रिटिशांच्या कायदयांनी गदा आणली . छोटा नागपूर परिसरातील कोलाम , उडीसातील गोंड , महाराष्ट्रातील कोळी , भिल्ल , रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . बिहारमध्ये संथाळांनी फार मोठ्या प्रमाणावर लढा दिला . हा लढा दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या . महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी केलेला लढाही असाच उग्र होता . उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले . त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले . १८३२ साली त्यांना फाशी देण्यात आले .
कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी व कोकणात फोंड - सावंतांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले . इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध १८५७ सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजेरजवाड्यांनीही लढे दिले .
इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनीदेखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी लढे दिले होते . त्यांपैकी १८०६ सालचा वेल्लोर येथील तसेच १८२४ सालचा बराकपूर येथील लढा , असे दोन्ही लढे विशेष उग्र स्वरूपाचे होते .
इंग्रजांच्या विरोधी झालेले हे सर्व लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे ; परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला . तो नाहीसा झाला नाही , मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा १८५७ मध्ये भडकला . दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी तसे १८५७ साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गामध्ये साचत गेलेल्या इंग्रजविरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा लढ्याने झाला .

१८५७ च्या लढ्याची कारणे :

इंग्रजपूर्व काळात भारतात राजवट बदलली तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राही . इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली . त्यामुळे भारतीयांच्या मनात अस्थिरतेची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व वाढत गेली .

आर्थिक कारणे :

इंग्रजांनी सुरू केलेल्या नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली . इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे भारतातील उद्योगधंदयांचा -हास झाला . त्यामुळे अनेक कारागीर बेकार झाले . त्यांच्या मनात इंग्रजविरोधी भावना बळावली . तसेच जी संस्थाने इंग्रजांनी ताब्यात घेतली , तेथील सैनिक बेकार झाले व तेही इंग्रजांचे विरोधक बनले .

सामाजिक कारणे :

भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यांत इंग्रज शासकांनी हस्तक्षेप केला . त्यांनी सतीबंदीचा कायदा , विधवा विवाहविषयक कायदा असे कायदे केले . असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे , असा लोकांचा समज झाला . त्यामुळे ते असंतुष्ट बनले .

राजकीय कारणे :

१७५७ सालापासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये नष्ट केली होती . सन १८४८ ते १८५६ या दरम्यान लॉर्ड डलहौसी याने अनेक संस्थाने खालसा केली . गैरकारभाराची सबब पुढे करून त्याने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले . त्याचे संस्थान ताब्यात घेतले . सातारा , झाशी , नागपूर इत्यादी काही संस्थाने तेथील राजांच्या दत्तकपुत्रांचा वारसाहक्क नामंजूर करून खालसा केली . काही पदच्युत राजांच्या वारसदारांचे तनखे रद्द केले . त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला .

हिंदी सैनिकांतील असंतोष :

हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत . सैन्यात सुभेदारपदापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे . गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे . त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले . अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकांत असंतोष साचत गेला .

तात्कालिक कारण :

इंग्रजांनी १८५६ साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एन्फिल्ड बंदुका दिल्या . त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली . त्या काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे . काडतुसांवरील आवरणाला गाईची किंवा डुकराची चरबी लावलेली असते , अशी बातमी पसरली . त्यामुळे हिंदू - मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष पसरला .

वणवा पेटला :
१८५७ चा स्वातंत्र्यलढा , मंगल पांडे
मंगल पांडे 

२९ मार्च १८५७ रोजी पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला . काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली . त्यांना अटक करून फाशी दिले गेले . ही बातमी देशातील इतर लष्करी छावण्यांमध्ये वणव्यासारखी पसरली . १० मे १८५७ रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली . सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले . वाटेत हजारो सामान्य नागरिक त्यांना सामील झाले . दिल्लीला पोचताच तेथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई त्यांना येऊन मिळाले . त्यांनी मुघल बादशाहा बहादुरशाहा जफर यांच्याकडे लढ्याचे नेतृत्व दिले . भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली .

लढ्याची व्याप्ती :

पाहता पाहता लढ्याचे लोण उत्तर भारतभर पसरले , बिहारपासून राजपुतान्यापर्यंतच्या इंग्रज छावण्यांतील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले . त्यांना अनेक लोक येऊन मिळाले . मे महिन्यात लढ्याला सुरुवात झाल्यानंतरच्या तीन - चार महिन्यांत पूर्व पंजाब , दिल्लीचा परिसर , रोहिलखंड , बुंदेलखंड , अलाहाबाद , अयोध्या , पश्चिम बिहार या प्रदेशांमध्ये हा वणवा पसरला . त्याचे लोण दक्षिण भारतातही पोहोचले . सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप व कारभारी रंगो बापूजी , कोल्हापूरचे चिमासाहेब , नरगुंदकर भावे , अहमदनगर जिल्हयातील संगमनेरजवळील भागोजी नाईक इत्यादी या लढ्यात अग्रभागी होते . नाशिक जिल्ह्यातील पेठ , सुरगाण्याच्या राणीसारख्या स्त्रियाही त्यात सामील झाल्या .
१८५७ साली खानदेशात कजारसिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेले भिल्लांचे लढे व सातपुडा भागात शंकरशाहांच्या नेतृत्वाखालील स्थानिक लढे इंग्रजांनी चिरडून टाकले . खानदेशातील लढ्यात सुमारे ४०० भित्त स्त्रिया सहभागी झाल्या होत्या .

लढ्याचे नेतृत्व :


मुघल साम्राज्य दुबळे झाल्यानंतर नादिरशाह , अब्दालीसारख्या परकीयांनी हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केली . मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली . त्याच भूमिकेतून मराठे अब्दाती विरुद्ध पानिपतावर लढले . १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात दुबळ्या मुघल साम्राज्याचा वारसदार बहादुरशाहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे . हे लक्षात आल्यानंतर बहादुरशाहाचे नेतृत्व मान्य काम नानासाहेब पेशवे ,
झाशीची राणी लक्ष्मीबाई , तात्या टोपे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली . याचाच परिणाम या स्वातंत्र्यलढ्यात हिंदू - मुस्लीम बांधवांचे ऐक्य झाल्याचे दिसून येते .
nanasaheb peshave , नानासाहेब पेशवे
नानासाहेब पेशवे 
तात्या टोपे
तात्या टोपे 
कुंवरसिंह व मुघल सेनापती बख्तखान या नेत्यांची कामगिरी महत्त्वाची आहे . दिल्ली , कानपूर , लखनौ , झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील लढ्याचे स्वरूप विशेष उग्र होते . दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्तखान याने आपल्या शिरावर घेतली . दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली .सप्टेंबर १८५७ मध्ये इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला . बहादुरशाहा यांना कैद केले व त्यांच्या मुलांची हत्या केली .
पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार कुंवरसिंह हे लढ्यात उतरले . रोहिलखंडात मौलवी अहमदउल्ला यांनी लोकांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरणा दिली .

बीमोड :

स्वातंत्र्य योद्धे व त्यांचे नेते प्राणांची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढले ; परंतु अचानक सुरू झालेल्या लढ्याच्या पहिल्या धक्क्यातून इंग्रज लवकरच सावरले . पुढील सहा महिन्यांतच संघर्षाचे स्वरूप पालटले . हातून गेलेली सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रजांनी परत मिळवली . राणी लक्ष्मीबाई , कुंवरसिंह , अहमदउल्ला हे धारातीर्थी पडले . बहादुरशाहांना रंगून येथे बंदिवासात ठेवण्यात आले . नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला . तात्या टोपे मात्र सुमारे दहा महिने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले ; परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती पडले . त्यांना इंग्रजांनी फासावर चढवले . अशा रीतीने सन १८५८ च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला .

लढ्याचे स्वरूप :

१८५७ च्या या लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने झाली . पुढे त्यात शेतकरी , कारागीर वगैरे सामान्य लोकही सामील झाले . तसेच काही जमीनदार व राजेरजवाडेही त्यात सहभागी झाले . इंग्रजांच्या जाचक वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी केलेला हा सशस्त्र संग्राम होता . या लढ्यात हिंदू व मुसलमान , भिन्न जातीजमाती , अमीर - उमराव व सामान्य लोक यांचा सहभाग होता . इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे त्यांचे समान ध्येय होते . त्यामुळे या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले .

अपयश का आले ? :

१८५७ चा लढा मोठ्या प्रमाणावर झाला ; परंतु इंग्रजी सत्ता नष्ट झाली नाही , कारण लढ्यामध्ये एकसूत्रता नव्हती . एककेंद्री नेतृत्व नव्हते . तसेच लढणाऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती . सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक लढ्यापासून अलिप्त राहिले . याउलट इंग्रजांजवळ एककेंद्री नेतृत्व होते . शिस्तबद्ध सैन्य होते . अद्ययावत शस्त्रास्त्रे होती . अनुभवी सेनानी होते . दळणवळणाचे नियंत्रण त्यांच्या हाती होते . त्यामुळे त्यांच्यापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही . १८५७ चा लढा अयशस्वी ठरला असला , तरी त्यांच्यातील हुतात्म्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही . हा लढा भारतीयांना पुढे प्रेरणादायी ठरला . या लढ्यामुळे इंग्रज सत्ता हादरली .

परिणाम :

१८५७ च्या लढ्याचे फार दूरगामी परिणाम झाले . इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे हा लढा झाला याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली . भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही , अशी त्यांची पक्की धारणा झाली , म्हणून त्यांनी १८५८ साली एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आणली . भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतला .

राणीचा जाहीरनामा :

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून नोव्हेंबर १८५८ मध्ये एक जाहीरनामा काढला . सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत . वंश , धर्म , जात किंवा जन्मस्थान यांवरून प्रजाजनांत भेदभाव केला जाणार नाही , शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले . भारतीयांच्या धार्मिक बाबतींत सरकार हस्तक्षेप करणार नाही असेही आश्वासन दिले . भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील , कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही , अशी स्पष्ट ग्वाही राणीच्या जाहीरनाम्याने दिली .

लष्कराची पुनर्रचना :

भारतातील इंग्रज लष्कराची पुनर्रचना करण्यात आली . युरोपीय सैनिक आणि अधिकारी यांच्या संख्येत वाढ करण्यात आली . भारतीय सैनिकांच्या पलटणी जातीनिहाय करण्यात आल्या . तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला . हे सर्व करण्यामागे भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत व त्यांनी पुन्हा असा लढा उभारू नये , हा इंग्रजांचा हेतू होता .

धोरणात्मक बदल :

१८५७ नंतर ब्रिटिशांनी आपल्या अंतर्गत धोरणातही बदल केले . भारताच्या सामाजिक बाबतींत ढवळाढवळ करायची नाही , असे धोरण त्यांनी स्वीकारले . त्याचबरोबर भारतीयांची सामाजिक एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले . ' फोडा आणि राज्य करा ' या नीतीचा वापर करून भारतातील साम्राज्य जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी भर दिला .
भारतीयांवरही या लढ्याचा खोलवर परिणाम झाला . प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला . ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी वापरलेले मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली . १८५७ चा स्वातंत्र्यलढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत ठरला .

Thursday, May 21, 2020

ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम

इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने १७५७ ते १८५६ या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला . आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी येथे नवी राज्यव्यवस्था उभारली .

दुहेरी राज्यव्यवस्था :

रॉबर्ट क्लाइव्हने १७६५ साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली . महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले , तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले . यालाच ' दुहेरी राज्यव्यवस्था ' असे म्हणतात .
दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले . सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले . भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता . कंपनीच्या भारतातील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली , तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण घालण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले .

पार्लमेंटने केलेले कायदे :

१७७३ च्या रेग्युलेटिंग कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला ' गव्हर्नर जनरल ' असा हुद्दा देण्यात आला . मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला . त्याच्या मदतीला चार सदस्यांची समिती नेमण्यात आली .
१७८४ मध्ये पिटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला . कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले .कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला . १८१३ , १८३३ व १८५३ मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले . अशा प्रकारे कंपनीच्या भारतातील प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले .
इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली . मुलकी नोकरशाही , लष्कर , पोलीस दल व न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते .

मुलकी नोकरशाही :

भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती . लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली . मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला . कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये , असा नियम त्याने घालून दिला . त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले .
प्रशासनाच्या सोईसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली . जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे . महसूल गोळा करणे , न्याय देणे , शांतता व सुव्यवस्था राखणे त्याची जबाबदारी असे . अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ( आय . सी . एस . ) या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली .

लष्कर व पोलीस दल :

भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे , नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती . देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे .

न्यायव्यवस्था :

इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली . प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले . त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालये स्थापन केली . 

कायदयापुढील समानता :

भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते . न्यायदानात जातींनुसार भेदभाव केला जाई . लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधिसमितीने कायदयाची संहिता तयार केली . सर्व भारतात एकच कायदा लागू केला . कायदयापुढे सर्व समान आहेत , हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले . या पद्धतीतसुद्धा काही दोष होते . युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये व वेगळे कायदे अस्तित्वात होते . नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत . न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चीक बाब होती . खटले वर्षानुवर्षे चालत .

इंग्रजांची आर्थिक धोरणे :

प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली . अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले . ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले . त्यांनी जरी येथे राज्य केले , तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत . इंग्रजांचे मात्र असे नव्हते .
इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते . औदयोगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती . या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली . त्यामुळे इंग्लंडचे आर्थिक लाभ झाले ; परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले .

जमीन महसूलविषयक धोरण :

इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती . शेती व इतर उदयोग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत . जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते . इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे . पीक चांगले आले नाही , तर शेतसाऱ्यात मिळे . महसूल प्रामुख्याने धान्यरूपाने घेतला जाई . शेतसारा भरण्यास उशीर झाला , तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे .
उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले . इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली . रोख रकमेत व ठरावीक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली . शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल , असा नियम केला . महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी होती . सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे .

नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे परिणाम :

नव्या जमीन महसूलव्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले . शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले . व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले . प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे . त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले . कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत . सरकार , जमीनदार , सावकार , व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत .

शेतीचे व्यापारीकरण :

पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत हे अन्नधान्य त्यांना परच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे . कापूस , नीळ , तंबाखू , चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले . अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला , त्या प्रक्रियेला ' शेतीचे व्यापारीकरण ' असे म्हणतात .

दुष्काळ :

१८६० ते १ ९ ०० या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले ; परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत . तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही .

वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा :

इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोईसुविधा निर्माण केल्या . कोलकता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला . १८५३ साली मुंबई - ठाणे मार्गावर आगगाडी धावू लागली . त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली . या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली . त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाकव्यवस्थाही सुरू केली . 
mumbai te thane pahili railway seva 1853, first indian train start in 16 april 1853
मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सेवा १८५३ 
या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाजजीवनावर दूरगामी परिणाम झाले . देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला .

भारतातील जुन्या उदयोगधंदयांचा ऱ्हास :

भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे . उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई . तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे . त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई . अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले . परिणामी भारतातील काही उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले .

भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास :

इंग्रज सरकारचा पाठिंबा , व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत ; परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली .
१८५३ मध्ये कावासजी नानाभॉय यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली . १८५५ मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली . १९०७ साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला . भारतामध्ये कोळसा , धातू , साखर , सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली .

सामाजिक व सांस्कृतिक परिणाम :

एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद , बुद्धिवाद , लोकशाही , राष्ट्रवाद , उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते . पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतातसुद्धा उमटणे स्वाभाविक होते . इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती . त्यासाठी त्यांनी येथील परंपरा , इतिहास , साहित्य , कला , तसेच येथील संगीत , प्राणी - पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली . १७८४ साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली . मॅक्सम्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म , भाषा , इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता . या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म , इतिहास , परंपरा यांचा अभ्यास करायला हवा , अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली .
Lord Bentinck , Lord William Bentinck
लॉर्ड बेंटींक
इंग्रजांनी अनेक कायदे केले . १८२ ९ मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला . १८५६ मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला . हे कायदे समाजसुधारणेस भारतात पूरक ठरले . प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती . लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार १८३५ मध्ये भारतात पाश्चात्त्य शिक्षण सुरू करण्यात आले . नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्त्य विचार , आधुनिक सुधारणा , विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली . १८५७ साली मुंबई , मद्रास ( चेन्नई ) व कोलकता येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली पाश्चात्त्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले .

Wednesday, May 20, 2020

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार

वास्को - द - गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत येथे येऊन पोहोचला , त्यानंतर सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली . सतराव्या शतकात डच , इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले . त्या वेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती . या पार्श्वभूमीवर भारतातील इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार यांची माहिती आपण घेऊया . 

युरोपीय व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली :

सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत . व्यापाराच्या सोईसाठी पोर्तुगीज , डच , इंग्लिश व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली . अशा ठाण्यास ' वखार ' म्हणतात . औरंगजेब बादशाहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली .
इंग्रजांची पहिली वखार , इंग्रज वसाहत
इंग्रजांची वखार - सूरत 
मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले . देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली . त्याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला .

इंग्रज - फ्रेंच संघर्ष :

भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती . अठराव्या शतकात कर्नाटकच्या नवाबपदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला . कर्नाटकच्या राजकारणात चंचुप्रवेश करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले . नवाबपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी , तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली . या स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात तीन युद्धे झाली . ती ' कर्नाटक युद्धे ' म्हणून ओळखली जातात . तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला . त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही .

बंगालमधील राजकीय घडामोडी :

बंगालमध्ये इंग्रज व फ्रेंच व्यापारी त्यांना मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करू लागले . सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी उभारली . यातूनच सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला . १७५७ मध्ये प्लासी येथे लढाई झाली . मीर जाफर या सेनापतीला नवाबपदाचे आमिष दाखवून इंग्रजांनी आपल्याकडे वळवून घेतले . त्याच्या नेतृत्वाखालील नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही . नवाबाला नाइलाजाने माघार घ्यावी लागली . अशा प्रकारे शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी फंदफितुरीने प्लासीची लढाई जिंकली .
इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला , पण पुढे त्याने विरोध करताच इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासीम याला नवाद बनवले . इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासीमने केला , तेव्हा इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिले .
बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला , मीर कासीम व मुघल बादशाह शाहआलम यांनी एकत्र मोहीम काढली . १७६४ साली बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले . त्यात इंग्रजांना विजय मिळाला . या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला . या तहान्वये बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला . याला ' दिवाणी अधिकार ' असे म्हणतात . अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला .

इंग्रज - म्हैसूर संघर्ष :

टिपू सुलतान
टिपू सुलतान 
म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात चार युद्धे झाली . म्हैसूरच्या हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्धची मोहीम नेटाने चालू ठेवली . १७ ९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला . त्यामुळे म्हैसूरचे राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले . 






इंग्रज व मराठे :

मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते . त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता ; परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती . माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली . त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला .
१७७४ ते १८१८ या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात तीन युद्धे झाली . पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले . त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली . १७८२ साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज - मराठा युद्ध संपले .  

तैनाती फौज :

१७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला . सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते . त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले . या करारांन्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले , मात्र त्यासाठी काही अटी घातल्या . भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे , त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून दयावा , त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे , आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ( प्रतिनिधी ) ठेवावा अशा त्या अटी होत्या . भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले .
१८०२ मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला . हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे ; परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता . त्यामुळे दुसरे इंग्रज - मराठा युद्ध झाले . त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला . तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले . या युद्धात त्याचा पराभव झाला . १८१८ मध्ये त्याने शरणागती पत्करली .

सिंधवर इंग्रजांचा ताबा :

भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले . रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती , म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले . अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते . यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि १८४३ साली त्यांनी सिंध गिळंकृत केला .

शीख सत्तेचा पाडाव :

शेर-ए-पंजाब , रणजीत सिंह
रणजीत सिंह 
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती . रणजितसिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला . त्याच्या वतीने त्याची आई जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली , मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही . ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर पंजाबवर आक्रमण करणार , असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला . या पहिल्या शीख - इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला .  दलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले . पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना जाचू लागला . मुलतानचा अधिकारी मूलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले . हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले . या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले . १८४९ मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला .
अशा प्रकारे देशी सत्तांना निष्प्रभ करून इंग्रजांनी भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले . 

Tuesday, May 19, 2020

Dr. Bhimrao Ramji Ambedkar biography in short

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर 

डॉ. भीमराव यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेश मधील महू गाव येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ होते , जे भारतीय सेनेमध्ये असताना देशाची सेवा करत होते आणि आपल्या चांगल्या कार्यामुळे ते सुभेदार च्या पद वरती होते . त्यांच्या आईचे नाव भिमाबाई असे होते रामजी सुरुवातीपासून आपल्या मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करत होते त्याच्यामुळे भिमराव यांना लहानपणापासून अभ्यासाचा छंद होता . परंतु ते महार जातीमधील होते . त्यांना त्याकाळी शूद्र असे म्हणत होते , शूद्र याचा अर्थ असा होतो की , खालच्या जातीतील लोकांच्या द्वारा वरच्या जातीतील लोकांच्या कोणत्याही वस्तूला हात लागला तर ती अपवित्र मानली जात होती . अशा खराब विचारांमुळेच खालच्या जातीतील मुलांना शाळेत जाऊ देत नव्हते . परंतु  भाग्याने सरकारने सेना मधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केली आणि त्यांच्यामुळेच भीमरावांची शाळेची सुरुवात सुरू झाली . शाळेमध्ये अभ्यासात चांगले असतानासुद्धा भीमरावांना वर्गामध्ये एका कोपऱ्यात बसावे लागत असे आणि त्यांना पाणी पिण्यासाठी सुद्धा नळाला हात लावण्याची परवानगी नव्हती . शाळेचा शिपाई येऊन दुरून त्यांच्या हातावरती पाणी टाकायचा तेव्हा ते पाणी प्यायचे आणि शिपाई नसल्यास त्यांना बिना पाण्याने राहावं लागत होते.
1894 मध्ये रामजी सकपाळ रिटायर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण परिवार महाराष्ट्र मधील सातारा जिल्ह्यामध्ये स्थायिक झाल . सातारा आल्यानंतर केवळ दोन वर्षांमध्ये भीमराव यांच्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांची देखभाल त्यांची आत्या मीराबाई यांनी अतिशय कठीण परिस्थितीत केली . रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांचे चौदा मुलांन पैकी फक्त तीन मुले बलराम , आनंदराव आणि भीमराव आणि तीन मुली मंजुला , गंगा आणि तुळसा हेच या कठीण परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकले . आपल्या भावांपैकी आणि बहिणींपैकी फक्त भीमराव यांनी समाजाला दुर्लक्ष करून आपलं शिक्षण पूर्ण केलं .
1897 मध्ये एल्फिस्टन हाय स्कूल मुंबई येथे ऍडमिशन घेतले आणि शाळेत छोटी जात मधील सर्वात पहिले विद्यार्थी होते . 1907 मध्ये भीमरावांनी हायस्कूल ची परीक्षा पास केली या यशामुळे त्यांच्या जातीमधील लोकांना एक मोठी खुशी झाली होती कारण त्याकाळी हायस्कूल पास करणे हे एक मोठी गोष्ट होती आणि तेही एक शूद्र मुलाने हे त्याहून आश्चर्यजनक गोष्ट होती . ह्या यशाला बघून अर्जुन केळुसकर यांनी भीमरावांना गौतम बुद्ध यांचे पुस्तक पुरस्कार म्हणून दिले . 
1912 मध्ये इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स यांच्यामध्ये आपली डिग्री प्राप्त करून आणि ते 1913 मध्ये स्कॉलरशिप प्राप्त करून पोस्ट ग्रॅज्युएशन साठी अमेरिका निघून गेले . तिथे त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून 1915 मध्ये एम ए ची डिग्री घेतली , आणि त्याच्याच पुढच्या वर्षी 1916 मध्ये त्यांना एक रिसर्चसाठी पीएचडी या डिग्री ने सन्मानित केले गेले . या रिसर्चला त्यांनी "evolution of provincial finance in British India" या रूप मध्ये प्रकाशित केले . आपली डॉक्टरेट ची डिग्री घेऊन 1916 मध्ये भीमराव लंडन मध्ये गेले तिथे त्यांनी लॉ मध्ये आणि अर्थशास्त्र मध्ये डॉक्टरेट ची तयारी करण्यासाठी आपले नाव लिहिले , परंतु पुढच्या वर्षी स्कॉलरशिप संपल्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण अर्ध्या मध्येच सोडून भारतात परत यावे लागले .भारतात येऊन ते क्लर्क आणि अकाऊंट यांसारखी नोकरी केली यानंतर 1920 मध्ये आपले साठवलेले पैसे आणि आपल्या मित्राच्या मदतीने लंडनला गेले . तिथे त्यांनी 1923 मध्ये त्यांनी आपलं रिसर्च "प्रॉब्लेम ऑफ रुपी" हे पूर्ण केलं . त्यानंतर त्यांना लंडन युनिव्हर्सिटी द्वारा डॉक्टर ऑफ सायन्स हे उपाधी दिली गेली. 
त्यानंतर त्यांनी आपलं जीवन समाजकार्यासाठी लावून दिलं होत . दलित समाजाला आजादी आणि भारत स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी त्यांनी बरेच पुस्तके लिहिली होती की जे पूर्ण समाजावरती प्रभावशाली ठरली .
1926 मध्ये ते मुंबई विधानसभा परिषद मध्ये सदस्य बनले . 13 ऑक्टोबर 1935 मध्ये डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना सरकारी लॉ कॉलेज मध्ये प्रिन्सिपल बनविले होते . 1936 मध्ये भिमराव यांनी स्वतंत्र लेबल ची स्थापना केली की जे 1937 मध्ये केंद्रीय विधानसभा मध्ये लढून 15 सीटे जिंकली होती . 
1941 ते 1945 मध्ये त्यांनी विविध पुस्तके प्रकाशित केली . 15 ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना पहिले कानून मंत्री बनवले आणि ठोस कानून भारताला त्यांनी दिले त्यानंतर त्यांनी लिहिलेले संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू केले आणि त्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचाराने भारतीय रिजर्व बैंक यांची स्थापना झाली .
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं मुंबईमध्ये निधन झाले .

Monday, May 18, 2020

Dr. A. P. J. Abdul Kalam Inspiration Thoughts


  1. स्वप्न ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता , स्वप्न तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत . 
  2. वाट बघणार्‍यांना तेवढंच मिळते जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात .
  3. " ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफ मध्ये बदलेल , त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झाले . ''
  4. " स्वप्न खरे होण्याआधी तुम्हाला स्वप्न बघावे लागतील . "
  5. " जर तुम्हाला सुर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सुर्यासारखे तपावे लागेल . "
  6. तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही . परंतू तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलतील , तुमच्या सवयी बदला आणि मग तुमचे भविष्य बदलेल .
  7. " प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडते . काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात ? "
  8. प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने केलेला प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही .
  9. जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे कधीच पाऊल मागे घेऊ नका.
  10. आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरुन पाहली जाते . शिक्षण मार्क्स वरून पाहले जाते . आदर , इज्जत पैसा पाहून दिली जाते .
  11. एखाद्याला हरवणेखूप सोपे आहे परंतू एखाद्याला जिकणे खूप अवघड आहे .
  12. काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विद्यार्थ्यांचे आयुष्य , त्यांचे भविष्य उज्वल बनवते .
  13. यशस्वी लोकांचे चरित्र वाचु नका , त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल . अपयशी लोकांचे चरित्र वाचा , त्यातुन तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील .
  14. जोपर्यत चांगले शिक्षण घेणे , म्हणजे चांगली नोकरी लागणे , हि संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही , तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील , मालक नाही .
  15. आयुष्यात येणाया कठिण परिस्थिती ह्या तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात , ते तर तुम्हाला तुमच्या मधिल क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात . म्हणून कठीण परिस्थितीना देखिल कळू द्या , कि तुम्ही देखील खुप कठीण आहात .
  16. मी हॅन्डसम व्यक्ति नाही आहे , पण मी माझे हॅन्ड गरजू someone ला मदत म्हणून देऊ शकतो . सुंदरता ही मनात असते तोंडावर नाही .
  17. कधी कधी वर्गबुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते , कारण आज मी मागे वळून बघतो , तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत .
  18. दोन परिस्थीतीमध्ये नेहमी शांत रहा .
    एक- जेव्हा तुम्हाला वाटेल की व्यक्ति तुमच्या शब्दांवरून तुमच्या भावना समजू शकणार नाही .
    दोन - जेन्हा समोरचा व्यक्ति तुम्हाला तुम्ही शब्दही न बोलता समजुन घेईल .
  19. जुने मित्र सोन्यासारखे असतात आणि नविन मित्र हियासारखे असतात . जेव्हा तुम्हाला हियासारखे मित्र मिळतील तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका . कारण सोन्याची अंगठीच हिन्यांना पकडून ठेवू शकते .
  20. प्रेम आंधळे असते , हे खरं आहे . कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरू केले होते .
  21. पहिल्या विजयानंतर थांबू नका , कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरलात , तर तुमचं पहिलं यशनशिबाने मिळालं होतं , हे म्हणण्यासाठी अनेकजणतयार असतात .
  22. महान स्वप्न पाहणाऱ्यांचे महान स्वप्न नेहमीच पूर्ण होतात .
  23. माणसाला समस्या , अपयशाची आवश्यकता असते . कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते .
  24. छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे , तुमचं ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे .
  25. तोपर्यंत लढणे थांबवू नका ,  जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही , तुम्ही एकमेव आहात .जीवनात एक ध्येय ठेवा , सतत ज्ञान प्राप्त करत रहा , कठोर मेहनत करा , महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत रहा .
  26. जर आपण स्वतंत्र नसणार , तर कोणीच आपला आदर करणार नाही .
  27. आकाशाकडे बघा , आपण एकटे नाही आहोत . संपूर्ण ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे . जे स्वप्न बघतात , मेहनत करतात , त्यांना त्याच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ब्रह्मांड नेहमी तयार असते .
  28. तरुणांना माझा संदेश आहे की , वेगळ्या पद्धतीने विचार करा , काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा , स्वतःचा रस्ता स्वतः बनवा आणि जे अशक्य आहे , ते मिळवा .
  29. तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे .
  30. पावसामध्ये सर्व पक्षी आश्रय शोधतात , परंतु गरुड ढगांच्या वरती उडून पावसाला टाळतो . समस्या सर्वांसाठी सारख्याच असतात , परंतु तुमचा त्या समस्या बद्दलचा दृष्टीकोन खूप मोठा बदल घडवतो .
  31. मला पूर्ण विश्वास आहे , ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल , तो यशासाठी आवश्यक तेवढी महत्त्वकाक्षा ठेऊ शकत नाही .
  32. सतत अपयश येत नसल्यास निराश होऊ नका , कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते .
  33. सक्रिय व्हा , जबाबदारी घ्या ! त्या गोष्टीवर काम करा ज्यावर तुमचा विश्वास आहे . जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात . 
  34. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहेत .
  35. देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो .
  36. यशाचे रहस्य काय ? 
    योग्य निर्णय घेणे 
    योग्य निर्णय कसे घ्यावे ? 
    अनुभवाने 
    आणि अनुभव कसे घ्यावे ? 
    चुकीचे निर्णय घेऊन .
  37. इंग्रजी शब्द ' END ' चा अर्थ शेवट नसून " Effort Never Dies " प्रयत्न कधीच वाया जात नाहीत , असा होतो .
  38. FAIL चा अर्थ अपयश असा होत नाही . तर तो " First Attempt in Learning " म्हणजेच " शिकण्यासाठी पहिला प्रयत्न "

Sunday, May 17, 2020

सिद्धार्थ गौतम का गृह त्याग

गृह त्याग 

     सिद्धार्थ ने सोचा कि वह भारद्वाज के पास जाकर प्रवजित हो जायेगा । भारद्वाज का आश्रम कपिलवस्तु में ही था । तदनुसार वह अपने सारथी छन्न हो साथ लेकर और अपने प्रिय अश्व कन्यक पर चढ़कर आश्रम की ओर चला । ज्योहर वह आश्रम के समीप पहुँचा , द्वार पर ही एकत्र हुए पुरूषो और स्त्रियों ने उसे ऐसे घेर लिया मानो वह एक नयी - नवेली वधू का स्वागत कर रहे हों । जब वे उसके सामने आये , उनकी आंख्ने आश्चर्य से खुली रह गई । उन्होने बन्द कमल की तरह हाथ जोड़कर उसे नमस्कार किया । वे उसे घेरे खड़े थे । उनके हृदय भावाविष्ट थे । वे ऐसे खड़े थे कि मानो वे अपने अर्ध - खिले नेत्रों से उसका पान ही कर रहे हों । कुछ स्त्रियों ने तो यही समझा कि वह कामदेव का साकार -रूप है । क्योकि वह अपने लक्षण तथा अलंकारों से ऐसा ही अंलकृत था । कुछ दूसरी स्त्रियों ने उसकी कोमलता और ऐश्वर्य की ओर ध्यान देकर सोचा कि अपनी अमृतमयी किरणों के साथ चन्द्रमा पृथ्वी पर उतर आया है । कुछ दूसरी स्त्रियाँ उस सौन्दर्य से इतनी पराभूत थी कि वह मुँह बाये खड़ी थीं , मानो उसे निगल ही जायेंगी । वे लम्बे आश्वास ले रही थी । इस प्रकार स्त्रियां केवल उसकी ओर देख ही रही थी । न उनके मुंह में शब्द था , न चेहरे पर मुस्कराहट । वे उसे घेरे खड़ी थी और उसके प्रव्रजित होने के विश्ख्य पर आश्चर्य से विचार कर रही थी ।  बड़ी कठिनाई से उसने उस भीड़ में से अपने लिये रास्ता निकाला और आश्रम के द्वार में प्रवेश किया । सिद्धार्थ को यह अच्छा नहीं लगता था कि शुद्धोदन और प्रजापति गौतमी उसके प्रव्रजित होने के समय उपस्थित रहे । क्योंकि वह जानता था कि ऐसे समय वे अपने को संभाले न रख सकेंगे । लेकिन उसकी जानकारी के बिना ही वे पहले से आश्रम आ पहुँचे थे ।
   ज्योती उसने आश्रम में प्रवेश किया उसने देखा कि उपस्थित मणडली में उसके माता - पिता भी है । अपने माता - पिता को वहाँ उपस्थित देखकर वह सर्वप्रथम उनके पास गया और उनका आशीर्वाद पाहा । ये भावना से इतने अधिक अभिभूत थे कि उनके मुंह से एक शब्द नहीं निकल रहा था । वे लगातार रोते रहे । उन्होने उसे छाती से लगाया और आसुओ से उनका अभिषेक किया । छन्न ने कंथक को एक पेड़ से बांध दिया था और पास खड़ा था । जब उसने देखा कि शुद्धोदन और प्रजापति आँसू बहा रहे है तो वह भी भावनावश अपने आँसुओं को न रोक सका । बही कठिनाई से अपने माता - पिता से पृथक् हो सिद्धार्थ वहाँ गया जहाँ द खड़ा था । उसे वापिस घर ले जाने के लिये उसे अपने वस्त्र और गहने - कपड़े दे दिये । तब उसने सिर गुण्डवाया । ऐसा करना परिखजाक के लिये आवश्यक था । उसका चचेरा भाई महानाम परिव्राजक के योग्य वस्त्र और भिक्षापात्र के आया था । सिद्धार्थ ने उन्हे पहन लिया । इस प्रकार परिखामक का जीवन व्यतीत करने की पूरी तैयारी करके वह भरद्वाज के पास गया कि वह उसे विधिवत् प्रअजित कर दें ।  अपने शिष्यों की सहायता से भारद्वाज ने आवश्यक संस्कार किये और सिद्धार्थ गौतम के परिब्राज़क बनने की घोषणा कर दी । यह याद करके कि उसने शाक्य संघ के सम्मुख दोहरी प्रतिमा की थी , एक तो प्रव्रज्या लेने और दूसरे अविलम्ब ही शाक्य जनपद की सीमा से बाहर आरम्भ कर दी । जो जनरागृह आश्रम में इकट्ठा हो गया था यह असामान्य था । सिद्धार्थ गौतम की प्रव्रज्या लेने की और दूसरे अविलम्ब ही शाक्य जनपद की सीमा से बाहर हो जाने की सिद्धार्थ गौतम ने प्रव्रज्या का संस्कार समाप्त होते ही अपनी यात्रा आरम्भ कर दी । उसने कपिलवस्तु से विदा ली और अनोमा नदी की ओर क्या पीछे मुड़कर देखा तो जनता अभी भी पीछे - पीछे चली आ रही थी । उसने उन्हें रोका और कहा- " बहनो और भाइयो ! मेरे पीछे - पीछे चले आने से क्या लाभ है ? मै शाक्यों और कालियों के बीच का माहा म निपटा सका । लेकिन यदि तुम समझौते के पक्ष में जनमत तैयार कर लो , तो तुम सफल हो सकते हो । इसलिये कृपा करके वापिस लोट जाओ । " उसकी प्रार्थना सुनी तो लोग पीछे लौटने लगे । शुद्धोदन और गौतमी भी महल को वापस चले गये । सिद्धार्थ के त्यागें वस्त्रों और गहनों को देखना गौतमी के लिये असह था । उसने उन्हे एक केवल के तालाब में फिंकवा दिया । प्रव्रज्या ग्रहण करने के समय सिद्धार्थ गौतम की आयु केवल २१ वर्ष की थी । लोग उसे याद करते थे और यह कह कह कर प्रशंसा करते थे कि " यह उस कुलोत्पत्र है , यह श्रेष्ठ माता - पिता की सन्तान है , यह सम्पन्न है , यह तारूण्य के मध्य में है , यह सुन्दर शरीर और बुद्धि से युक्त है , सुख - भोग में पला है और वही अपने सम्बन्धियों से इसलिये दण्ड स्वीकार किया जिसका जिसका मतलब था ऐश्वर्य के स्थान पर दरिद्रता , सुख समृद्धि के स्थान पर भिक्षाटन , गृह - निवास के स्थान पर गृह त्याग । और यह जा रहा है जब कोई इसकी चिन्ता करने वाला नहीं , और यह जा रहा है बिना किसी भी ऐसी एक चीज को साथ लिये जिसे अपनी कह सके । “ इसका यह स्वेच्छा से किया हुआ महान् त्याग है । यह बड़ी ही वीरता और साहस का कार्य है । संसार के इतिहास में इसकी उपमा नहीं । यह शाक्य मुनि अथवा शाक्य - सिहं कहलाने का अधिकारी है । "  शाक्य - कुमारी कृषा गौतमी का कथन कितना सही था । सिद्धार्थ गौतम के ही सम्बन्ध में उसने कहा था । “ धन्य है वे माता - पिता जिन्होंने ऐसे पुत्र को जन्म दिया और धन्य है वह नारी जिसका ऐसा पति है । "