Tuesday, May 5, 2020

Inspiring Thoughts of Dr. B. R. Ambedkar


dr. bhimrao ramji ambedkar, dr. baba saheb ambedkar
Dr. Bhimrao Ramji Ambedkar


















1) आकाशातील ग्रह‌‌-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील, तर माझ्या मेंदुचा आनि माझ्या मनगटचा काय उपयोग ?

2) आपल्याला कमीपणा येईल , लाज वाटेल असा पोषाख करू नका . तुमचा पोषाख तुमची सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्ही वाढवेल .

3) अन्याय करणाऱ्यापेक्षा, अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.

4) विश्वास देवावर नाही तर, स्वतःच्या मनगटावर ठेवा.

5) मी नदीच्या प्रवाहाला हलवणाऱ्या भक्कम खडकासारखा आहे.

6) माणूस धर्माकरिता नाही तर धर्म माणसाकरिता आहे

7) शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.

8) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाटेला कोणीही जाणार नाही . वाघ बनून जागा .

9) माणसाला आपल्या दारिद्र्याची, आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नये; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची .

10) शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा .

11) शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिणार तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

12) मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील, त्यादिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

13) मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो .

14) ग्रंथ हेच गुरु .

15) शरीरामध्ये रक्ताच्या शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

16) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरण्यास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

17) अन्याया विरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनवलं पाहिजे .

18) जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांचे ध्येय गाठतात .

19) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागर याच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल .

20) स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा .

21) जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या . कारण भाकर तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल .

22) संविधान कितीही चांगले असो , ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे , ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही .

23) ज्या दिवशी मला वाटेल की , संविधानाचा दुरुपयोग  केला जात आहे त्या दिवशी मी ते जाळून टाकेल .

24) फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे , तर बुद्धीला सत्याकडे , भावनेला माणुसकी कडे आणि शरीराला आश्रमाकडे येण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण .

25) जसा माणूस उपासमारीने अशक्त होतो , तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्यांच्या गुलाम होतो .

26) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे .

27) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका . या जगामध्ये काहीतरी करून दाखवायचे आहे . अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्या कडे असले पाहिजे . लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात .

28) नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा .

29) प्रत्येक पावलावर स्वतःच्या ज्ञानात भर टाकत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते ?

30) शिक्षण हे पवित्र संस्था आहे , शाळेत मने सुसंस्कृत होतात . शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय .


31) इतरांचे दुर्गुन शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे .

32) ज्यांच्या अंगी धर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही .

33) मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ घालवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने सुरुवात करणे अधिक चांगले असते .

34) तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार .

35) जीवन हे मोठे नाही तर महान असले पाहिजे .

36) हिंसा ही एक वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे .

37) शक्तीचा उपयोग वेळ - काळ पाहूनच करावा .

38) माणूस कितीही जरी विद्वान असला जर तो इतरांचा द्वेष करणे इतका स्वतःला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो .

39) हक्क मागून मिळत नसतो , त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो .

40) तुम्ही सूर्याप्रमाणे प्रकाशित व्हा , पृथ्वीप्रमाणे पर परप्रकाशित होऊ नका .

41) बोलताना विचार करा , बोलून विचारात पडू नका .

42) शब्दांना कृतींचे तोरण नसेल तर शब्द निरर्थक ठरतात .

43) मी असा धर्म मानतो जो स्वातंत्र्य , समता आणि बंधुभाव यांची शिकवण देतो .

44) धर्मा हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे .

45) बौद्ध धर्म हा जगातील सर्वात महान धर्म आहे कारण तो केवळ धर्म नसून एक महान सामाजिक सिद्धांत आहे .

46) भगवान बुद्धाने सांगितलेले तत्वे अमर आहेत . पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही . कालानुरूप बदल करण्याची सोय आहे . एवढे उदारता कोणत्याही धर्मात नाही आहे .

47) सामाजिक समतेचा बुद्ध इतका मोठा पुरस्कर्ता जगात कोणीच झाला नाही .

48) मी समाजकार्यात आणि राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थी आहे .

49) मी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे .

50) तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजु नका,
त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल , तेव्हा मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल .

51) जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता .

52) साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा . मग बघा काय चमत्कार घडतो ते .

53) लोकशाहीचे दोन शत्रु म्हणजे " हुकूमशाही ''
माणसा-माणसांत भेद मानणारी " संस्कृती '' .

54) मी महिलांच्या प्रगती वरून त्या समाजाचे प्रगतीचे मोजमाप करतो .

55) लोकांनी आपले स्वतंत्र कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये . तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये , की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाऱ्यांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल .

1 comment: