- बाबा साहेब हे रामजी आणि भीमाई चे चौदावे आणि शेवटचे पुत्र होते. म्हणून त्यांना चौदावे रत्न देखील म्हणतात. आणि त्यंचा जन्म सुद्धा 14 तारखेला झाला होता.
- बाबा साहेबांचे नाव भीमराव होते हे नाव रामजींनी महाभारतातील भीमच्या नावावरून ठेवले होते.
- बाबा साहेबांना सावत्र आई सुद्धा होती, भीमराव 5 वर्षाचे असतांना आई भीमाई चे निधन झाले होते आणि पिता रामजीने जिजाबाई नावाच्या महिले सोबत लग्न केले होते.
- बाबा साहेबांच्या शिक्षणामध्ये जेवढी मोठी भूमिका रामजींची होती तेव्हढीच मोठी भूमिका आणि त्याग बाबा साहेबांचे भाऊ आनंदराव यांचा देखील होता. रामजींची नोकरी गेल्यानंतर 1904 नोवेंबर मध्ये मुंबईला आले, त्यांना नोकरी मिळत नव्हती. मग त्यांनी आनंदरावांचे शिक्षण बंद करून त्याला कामाला लावले कारण आनंदराव आणि भीमराव यांना दोघांना शिकवायला पैसा नव्हता म्हणून आनंदरावांना भीमरावांनसाठि स्वताचे शिक्षण बंदकरून काम करू लागले.
- बाबा साहेबांचे मूळ आडनाव सकपाळ होते, पुढे त्यांचे आंबावडे गावावरुण आंबावडेकर असे पडले. त्यानंतर त्यांच्या शिक्षकाने त्यांना “आंबेडकर” असे नाव दिले. तेच नाव पुढे जगप्रसिद्ध झाले.
- बाबासाहेबांचे लग्न 1905 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी रमाबाई सोबत झाले.
- भारतातील जाती त्यांची रचना, “उत्पत्ति आणि वृद्धी” बाबासाहेबांचा शोधलेख म्हणजेच त्यांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.
- “The Evolution of Provincial Finance in British India” या ग्रंथाची
प्रस्तावना त्यांचे शिक्षक प्रो. सेलिग्मन यांनी लिहिली होती. सायाजीराव गायकववाड
यांना समर्पित आहे.
- बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैशांची गरज होती, तेव्हा बाबा साहेब 2 मुलांना घरी जाऊन शिकवायचे. याचे त्यांना 100 रु. महिन्याचे मिळायचे.
- अभ्यासासाठी बाबासाहेब सकाळी 6 वाजेला वाचनालायाच्या बंद दवाज्याजवळ उभे राहत असत. दरवाजा उघडला की ग्रंथालयात त्यांचा पहिला प्रवेश असत असे, वाचण्यासाठी त्यांना पुरेल येव्हडी पुस्तके ते आपल्या बसायच्या जागेवर आणून ठेवत असत आणि ग्रंथालयामधून सर्वात शेवटी बाहेर पडत असत.
- मुंबई मध्ये पैशांसाठी त्यांनी “ स्टॉक अँड शेअर्स अड्व्हायजर्स” कंपनी टाकली होती. शेअर्स खरीदरांना आणि विक्रीदारांना ते सल्ला देत असत. पण ते कंपनी महारची होती असे समजल्यावर तीनच्या कडे कोणीच आले नाही वाती कंपनी बंद करावी लागली.
- 1927 सप्टेंबर आक्टोंबर मध्ये कार्यकर्ते मंडळी डॉ. भीमरावांना आदराने बाबा साहेब म्हणू लागले.
- मुंबई मध्ये बाबासाहेबांनी राहण्यासाठि राजगृह नावाची इमारत बांधली होती. त्यांनी चार मीनार नावाचे घर सुद्धा बांधले होतेपण ग्रंथ खरेदी साठी ते विकावे लागले.
- 13 ऑक्टोबर 1935 ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती, धर्मांतराची घोषणा केल्या नंतर सर्वात आधी शीख धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण बाबासाहेबांना आले होते.
- बाबासाहेबांना नऊ भाषेचे ज्ञान होते, त्यामध्ये हिन्दी, पाली, संस्कृत, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, मराठी, पर्शियन आणि गुजराती ह्या भाषा होत्या.
- लॅंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्स मध्ये असतांना बाबासाहेबांनी 8 वर्ष लागणारा अभ्यासक्रम बाबासाहेबांनी फक्त 2 वर्ष 3 महिन्यांत पूर्ण केला होता.
- बाबासाहेब 64 विषयांमद्धे पारंगत होते, त्यांनी विविध धर्मांचा 21 वर्ष आभ्यास सुद्धा केला होता.
- बाबासाहेबांच्या वैयक्तिक वाचनालयात 50.000 पेक्षा जास्त पुस्तके होती. आणि हे जगातील सर्वात मोठे वैयक्तिक वाचनालय होते.
- तिरंग्यामद्धे अशोक चक्रला स्थान मिळून देण्याचं श्रेय बाबासाहेबांना जाते.
- बाबासाहेब हे विदेशात जाऊन अर्थशास्त्रात Ph.D करणारे पहिले भारतीय होते.
- 1945 मध्ये भरलेल्या जागतिक बुद्धिस्ट परिषदेत बुद्ध भिक्खुंनी बाबासाहेबांना बोद्धीसत्व ही बौद्ध धर्मातील सर्वात मोठी उपाधी दिली होती.
- बाबासाहेब हे जगातील एकमेव नेते आहेत की ज्यांच्यावर जगात सर्वात जास्त गाणी आणि पुस्तके लिहिली गेली आहेत.
- कोलंबिया युनिव्हार्सिटीने बनवलेल्या जगातील 100 विद्वनांच्या यादीत पहिले नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर होते.
- नोबेल पुरस्कार विजेते प्रो. अमर्त्य सेन बाबासाहेबांना अर्थशास्त्रात आपले पिता मानत होते.
- महात्मा गांधी आणि लॉर्ड लिंनलिथगो असे मानत होती की बाबासाहेब 500 ग्रॅजुएट आणि 1000 विद्वानाएवढे हुशार आहेत.
- चंद्रामणी महास्तविर यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. व त्यांनीच बाबासाहेबांना या युगातील “आधुनिक बौद्ध” असे संबोधले होते.
- बाबासाहेब भगवान गौतम बौद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले या तिघांना गुरु मानत होते.
- जगात सर्वात जास्त पुतळे बाबासाहेबांचेच आहेत आणि बाबासाहेबांची जयंती हे फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात साजरी केली जाते.
- बाबासाहेब हे अस्पृश्य वर्गातील पहिलेच वकील होते.
- बाबासाहेबांचा पहिलं पुतळा 1950 ते जीवंत असतांना बांधला गेला होता.
- बाबासाहेबांचे आत्मचरित्र “ Waiting for a Visa” हे पुस्तक कोलंबिया युनिव्हार्सिटीमध्ये पाठ्यपुस्तक म्हणू अभ्यासक्रमात आहे.
- पिण्याच्या पाण्यासाठी अत्याग्रह करणारे बाबासाहेब जगातील एकमेव व्यक्ति आहेत.
- बाबासाहेबांना symbol of Knowledge म्हटले जाते. कोलंबिया युनिव्हार्सिटीने बाबासाहेबांना Father of Modern India ही पदवी देखील दिली आहे.
- बाबासाहेब फक्त शिक्षक, वकील, लेखक किंवा नेते येवढेच नव्हते तर ते Musician देखील होते. बाबासाहेबांचे आवडते वाद्य तबला आणि व्हायोलिन होते.
- बाबासाहेबांनी एक कॉलेज सुद्धा उघडले होते, त्या कॉलेज चे नाव सिद्धार्थ कॉलेज असे होते.
- बाबासाहेबांनी जवळपास 8.50.000 अनुयायांसह बौद्ध धर्मात धर्मांतर केले होते, ह जगातील सर्वात मोठे ऐतिहासिक धर्मांतर होते.
- बाबासाहेब 1952 मध्ये निवडणूक हरले होते. परंतु नंतर ते राज्यसभेत सदस्य म्हणून निवडून आले होते.
- Indian lebour conforance च्या सातव्या सत्रात बाबासाहेबांनी 12 तासावरून 8 तास केले होते.
Wednesday, May 6, 2020
Fact of dr. Bhimrao Ramji Ambedkar
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment