Thursday, May 14, 2020

कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास


राजर्षी शाहू महारज

राजर्षी शाहू महारजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कोल्हापूर जिल्यातील कागल गावी घाटगे घराण्यात झाला . कोल्हापूर संस्थानेचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृतीऊ नंतर गादीला वारस नव्हता . म्हणून महाराजांच्या मृतीऊ नंतर तीनच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटगे घराण्यातील यशवंत जयसिंग घाटगे यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले, आणि नामकरण झाले शाहू महाराज .
शाहू महाराज
शुहू महराजांचा राज्याभिषेक इ.स. १८९४ ला पार पडला . महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले . उच्च शिक्षणासाठी राजवाड्यात व्यवस्था करण्यात आली . त्याची जबाबदारी ब्रिटिश अधिकारी Stuart Midford Fraser यांच्याकडे इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजच्या जीवनावर कायम प्रभाव होता . त्यामुळेच कार्यात आधुनिकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो . राज्याभिषेकपासून चालू असलेल्या राज्यकारभारात , सामाजिक कार्यात अनेक ढळसी निर्णय घेतले आणि ते आमलात देखील आणले . छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुलामुलीन च्या शिक्षणासाठी मोफत व्यवस्था केली . त्यासाठी प्राथमिक शाळा , हायस्कूल , कॉलेज आणि वसतिगृह यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली . मुलांना शाळेत न पाठवणार्‍या पालकांवर त्याकाळी शाहू महाराजांनी १ रु. दंड लावला होता . स्वता उत्तम कुस्ती पटू असल्यामुळे कुस्ती या खेळाला राजश्रेय मिळाऊन दिल तर शाहू महाराजांनीच त्यासाठी १८९५ साली मोतिबा तलमी ची स्थापना केली, तर येव्हढेच करून थांबले नाही तर खासाबाक सारख्या मैदानाची इ.स. १९१२ साली निर्मिती केली .
शेतकर्‍याचे प्रश्न , शेतीचे सिंचन , पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था , वीजनिर्मिती यासाठी राधांनगरी धरण बांधण्याचा संकल्प केला . इ.स. १९०९ साली त्या धरणाच्या कामासाठी सुरूवाट झाली . इ.स. १९१८ पर्यंत धरणाचे काम ४० फूटा पर्यंत झाले . इ.स. १९५७ ला हा प्रकल्प पूर्ण झाला . सामाजिक बांधीलकेचे भान आणि दूरदृष्टी यामुळेच कोल्हापुरात रेल्वे आण्यात महाराजांचा मोठा वाटा होता .
छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह १८९१ साली बडोद्याचे मराठा सरदार कृष्णराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला . कोल्हापूर शहराचा विकास करतांना भटक्या जनावारांसाठी पांजर पोर , घोड्यांची देखभालीसाठी सोंतली येथे मोठी पागा . कोल्हापूर शहराचा विकास करतांना कोल्हापूर मध्ये अनेक बाजार पेठ  निर्माण केल्या . गुळाची मोठी बाजारपेठ तयार केली . इ.स. १९१७ साली विधवा पुनर्विवाह कायदा केला . इ.स. १९१९ आंतरजातीय विवाह कायद्यात मंजूरी दिली . जात-पात , उच-नीच याचा विरोध करून सर्व धर्म समभाव ही भावना कायम जनसामन्याच्या मनात जागृत ठेवली .
कानपुर मध्ये भरलेल्या १३व्या क्षत्रीय कुर्मी अधिवेशनात महाराजांना राजर्षी  हा बहुमान मिळाला . कलेला महत्व देतांना केशवराव भोसले नाट्यगृहाची निर्मिती केली , गायन समाज देवल क्लब स्थापना केली . २७ मार्च १८९५ ला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उटघाटण त्यांच्या हस्ते झाले . ४८ वर्षाच्या अल्प आयुष्यात बहुजन समाजासाठी येव्हढे मोठे महान कार्य केल्यामुळेच छत्रपती , राजर्षी , रायतेचा राजा या उपद्या त्यांना सार्थ ठरतात .
०६ मे १९२२ रोजी मुंबई येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं महानिर्वाण झाले .

No comments:

Post a Comment