- १८४८ साली महात्मा फुले यांनी पुणे येथे बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.
- जुलै १८५१ मध्ये बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली.आणि सप्टेंबर १८५१ मध्ये रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली.
- १८५२ चिपळूणकर वाड्यात अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा आणि पूना लायब्ररीची स्थापना केली.
- १८५३ मध्ये "महार मांग लोकांसाठी विद्या शिकवणारी मंडळी'' या नावाची संस्था पुण्यात स्थापन केली. ( या कार्यास दक्षिण प्राईज फंडातून आर्थिक सहाय्य मिळाले )
- १८५५ मध्ये महात्मा फुले यांनी प्रौढांसाठी देशातली पहिली रात्र शाळेची स्थापना केली.
- १८६० मध्ये विधवा पुनर्विवाह पुरस्कार व त्यासाठी सहाय्य.
- १८६३ साली महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.
- पुण्यातील गोखल्यांच्या बागेत १८६४ साली शेणवी जातीतील पहिला पुनर्विवाह घडून आणला.
- अस्पृश्य लोकांसाठी १८६८ मध्ये महात्मा फुले यांनी आपले स्वतःच्या घरचे पाण्याचे हौद खुले केले.
- २४सप्टेंबर १८७३ ला पुण्यामध्ये सत्यशोधक समजाची स्थापना केली.
- रानडे यांनी १८७५ साली पुण्यात दयानंद सरस्वती मिरवणूक काढली. त्यावेळी महात्मा फुलेंनी सहकार्य केले.
महात्मा जोतिराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २ नोव्हेंबर १८९०) हे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील लेखक होते. अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन आणि महिला मुक्ती यासारखे त्यांचे कार्य अनेक क्षेत्रात विस्तारले. ते मुख्यतः महिला आणि निम्न जातीच्या लोकांना शिक्षण देण्याच्या प्रयत्नांसाठी ओळखले जातात. ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील महिला शिक्षणाचे प्रणेते होते. सर्व धर्म आणि जातीतील लोक या संघटनेचा एक भाग बनू शकले ज्याने उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले. महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीतील फुले हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते
No comments:
Post a Comment