बुध्द आणि कार्ल मार्क्स
कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्यामधील तुलना विनोद म्हणूनही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही . मार्क्स व बुद्ध यांच्यात २३८१ वर्षांचे अंतर आहे . बुद्ध इ . स . पूर्व ५६३ मध्ये जन्माला आले व कार्ल मार्क्स इ . स . १८१८ मध्ये. कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्त्वज्ञानाचा नव्या राज्यव्यवस्थेचा- एका नव्या अर्थशास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्यशास्त्राशी वा अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक , यापेक्षा आणखी कोणीही नाही, असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचारक्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्त्वामधील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे ' बुद्ध आणि कार्ल मार्क्स ' हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा करतील. मार्क्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन ! मार्क्सवादी म्हणतील की, बुद्धाची त्यांच्या गुरुशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रमप्राप्त आहे . अशा दोन व्यक्तींमध्ये कसली तुलना होऊ शकणार ? मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार ? बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकवू शकणार ? काहीही असो, या दोहोंमधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोहोंचेही वाचन झाले असल्यामुळे व दोहोंच्या तत्त्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्यावर येऊन पडते . जर मार्क्सवाद्यांनी त्याचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की , ते त्यांचा रोख बदलतील. बुद्धाचा उपहास करण्याचे त्यानी ठरवले असल्याने ते त्याची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल . परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की , त्यांनी दखल घ्यावी असे , त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीतून काहीतरी आहे , हे त्यांच्या लक्षात येईल .
No comments:
Post a Comment